Scorpio Accident Charthana Bridge
चारठाणा : नांदेड - संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा येथील चौथ्या पुलावरून स्कार्पिओ (28 ए जे 67 86) रस्ता सोडून खाली घसरली. ही घटना आज (दि. १९) दुपारी साडेतीन वाजता घडली. स्कार्पिओ जिंतूरहून सिंदखेड राजाकडे जात होती.
पृथ्वीराज अर्जुन चव्हाण (वय 17, रा. मंठा), गजानन मोहन शिंदे (वय 22, रा. मलकापूर, पांगरा, ता. सिंदखेड), राजा रोशन प्रदीप चव्हाण (वय 19, रा. टोकवाडी, ता. मंठा), सोनू अझहर पठाण (वय 20, रा. सिंदखेडराजा) अशी जखमींची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. झिंजुर्डे, जमादार आर. एम. कोंढरे, जिलानी शेख, एच. पी. गायकवाड, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक इरफान इनामदार, सूर्यकांत हाके, मनोहर हाके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तत्काळ जिंतूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. गजानन शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे नांदेड - संभाजीनगर राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चारठाणा पोलीस व महामार्ग पोलीस यांनी वाहतूक पूर्ववत केली.