पूर्णा : नगरपालिका निवडणूकीनंतर विद्यमान न्यायालयाने १६ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत घेण्याचा निर्णय दिला. त्या अनूषंगाने मागील सहा दिवसांपासून पूर्णा तालूक्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
कारण,जि प, पं स निवडणूका लांबणीवर पडतील या अर्विभावात वावरणाऱ्या राजकीय नेत्यांचे एकदम डोले पाण्यात पडले. यातच, निवडणूक प्रक्रिया ता १६ जानेवारी रोजी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चालू झाली.असे असताना पूर्णा तालूक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण सदस्य पद निवडीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे तालुका प्रमुख खडबडून जागे झाले.
कोण निवडून येवू शकतो? अशा पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्ष प्रमुखांची दमछाक होताना दिसत आहे. कारण, निवडणुकीत जो ही निवडणूक लढवील तो पैसेवाला हवाय?याकरीता कोण ईच्छूक आहे? याची चाचपणी घेण्यात अमूल्य वेळ खर्ची घातला जात आहे. या व्युवहरचनेत काही पक्ष यशस्वी ठरताहेत तर काहींना धनदांडगे उमेदवारच मिळत नाहीत. त्यामुळे अद्याप कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार ठरलेत?असे एखाद्या तालुका पक्ष प्रमुखास विचारणा केली तर त्यांच्याकडून उत्तर मिळतेय की,आम्ही त्याच भानगडीत आहोत असे उत्तर मिळत आहे.
असी परिस्थिती असताना पूर्णा तालूक्यात मागील काही काळापासून खुद्द उमेदवारांनीच मतदान देण्यासाठी आर्थिक लालूच लावली. त्या प्रमाणे या जि प पंचायत समिती निवडणूकीत तर एक अनोखा प्रयोग राबवला जात असल्याचे दिसून येतेय. यात,चुडावा जि प गटासाठी पैशेवाला उमेदवार म्हणून वेगवेगळे आमिष दाखवून मुंबई वरुन धनदांडगे उमेदवार आयात केले जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही मोठी रंगतदार ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.