परभणी

पूर्णा : शेतात जाणारा रस्ता अडवला, शेतकऱ्यांनी धरले अमरण उपोषण

Shambhuraj Pachindre

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील आव्हई येथील काही शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा रस्ता अज्ञात लोकांनी अडवला. तो खुला करुन देण्याच्या मागणीसाठी सबंधीत शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

या सबंधी सविस्तर माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील आव्हई येथील शेतकरी पंढरी पवार, मनोहर पवार, मोतीराम पवार, गोविंद पवार, माधव पवार, बाबाराव पवार, यशवंत पवार या शेतकऱ्यांनी त्यांच्या गट क्रमांक १९०,१९८,१९९ मधील शेताकडे जाणारा शेतरस्ता तेथील काही जणांनी अडवला.

त्यामुळे अडवलेल्या रस्त्यापलीकडील भागात जवळपास चाळीस ते पन्नास एकरची वहिती करणे मुश्किल झाले आहे. अडवणारे शेतकरी दादागीरी करुन भांडण करतात. त्यामुळे आगामी खरीप पेरणी शेतरस्त्या अभावी बंद राहणार असून सदरील जमीन पडीत ठेवण्याची वेळ उपोषणकर्ते शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सदर अडवलेला शेतरस्ता खूला करुन देण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी आजपासून (दि.13) अमरण उपोषण चालू केले आहे. दरम्यान,या प्रकरणी तहसिलदार अडवलेला रस्ता खुला करण्यासाठी काय कारवाई करतात, याकडे सबंधीत शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT