अपघातात जखमी झालेले मादी वानर  
परभणी

Monkey Accident | पूर्णेतील तहसिल रोडवर मादी गर्भवती वानरास कारने उडवले, वेळेत उपचार न मिळाल्याचे दुर्देवी मृत्‍यू!

परभणी वन कार्यालयात जखमी वानरांचा मृत्यू, पशूवैद्यकीय अधिकारी सर्जन वेळेत उपलब्ध झाले नसल्याने वानराने सोडले प्राण

पुढारी वृत्तसेवा

आनंद ढोणे

पूर्णा: येथील ताडकळस ते पूर्णा रोडवर असलेल्या तहसिल कार्यालयासमोर ता २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजे दरम्यान एक मादी गर्भवती वानर रस्ता ओलांडत असताना त्यास एका भरधाव वेगात असणाऱ्या कारने जोराची धडक देवून उडवले. या अपघातात सदरील वानराच्या पोटास आदळून जबर मार लागून पोट फूटले गेले.

सदरील गर्भवती दोन जिवाच्या वानरास गंभीर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पशूप्रेमी डॉ. कैलाश श्रिमल यांना तेथील ओळखीच्या लोकांनी तात्काळ संपर्क करत माहिती दिली. ते त्वरित घटनास्थळी दाखल होवून त्यांनी उपचारासाठी स्थानिक पशूवैद्यकीय डॉक्टरास संपर्क केला परंतु मुख्य पशूधन विकास अधिकारी हजर नसल्याने त्या ऐवजी एक पशूसेवादास येवून त्यांनी थातूरमातूर मलमपट्टी केली.

तद्नंतर सामाजिक कार्यकर्ते मोहन गुंजकर यांनी परभणी येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यास संपर्क केला. त्यावरुन वनविभागाची गाडी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल होत त्यांनी सदरील जखमी वानरास परभणी येथील वन कार्यालयात आणून पिंजऱ्यात कैद केले. त्यावेळी त्या वानर बेशुद्ध होऊन मान टाकत होते. तेथेही पशूवैद्यकीय सर्जन डॉक्टर उशिरा उपलब्ध झाला नाही.अखेर सदरील गर्भवती वानर ता २९ मार्च रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान मृत्यू पावल्याचा दिसून आले. या घटनेमुळे वन्यजीव प्राण्यांना कोणी वालीच नसल्याचे निदर्शनास आले.

वेळीच योग्य ठोस उपचाअभावी गर्भवती वानराचा गेला जीव

दरम्यान,ज्या वेळी सदरील वानरास अज्ञात कारने धडक देवून जखमी केले होते. त्या वेळी पूर्णेतील पशूवैद्यकीय दवाखान्यात पशूधन वैद्यकीय सर्जन डॉक्टर वानराचा उपचार करण्यासाठी उपलब्ध झाला नाही. वेळीच तक्ष पशूवैद्यकीय विकास अधिकारी आला असता तर त्यांनी योग्य उपचार अथवा पोटाची शस्त्रक्रिया केली असती तर गर्भवती मुक्या वानरासह दोन्ही जिवाचे प्राण वाचवले असते. परंतू,शहर व तालुक्यातील सरकारी पशूवैद्यकीय अधिकारी कर्तव्यापासून बेफिकीर राहत असल्यामुळे ही घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT