पूर्णा महसूल अधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगर येथे अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्त केला.  Pudhari Photo
परभणी

पूर्णा महसूल अधिकाऱ्यांचा आता एकच ध्यास, अवैध रेतीमाफीयांचा करणार पर्दाफाश

कळगाव नदीपात्रातून केले अवैध रेती उत्खननाचे तराफे नष्ट

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार बोथीकर आणि नायब तहसीलदार प्रशांत थारकर हे आता अवैध गौण खनिज उत्खनन आणि त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या माफीयांविरुद्ध चांगलेच तापल्याचे पहावयास मिळत आहे. त्यांनी लक्ष्मीनगर येथे अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्त केला.

१४ फेब्रुवारी रोजी भल्या सकाळी गस्त घालत असताना कळगाव शेतशिवारात असलेल्या गोदावरी नदीपात्रात फरकंडा गावच्या बाजूने रेतीचे चोरट्या मार्गाने अवैध उत्खनन करुन वाहतूक करतानाचा प्रकार निदर्शनास आला. अवैध रेती उपसा करणा-यांविरुद्ध नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकाने सापळा रचून छापेमारी करुन सदर अवैध रेती उत्खनन उपसा घटनास्थळी दाखल होताच वाळू माफिया तेथून साहित्य सोडून सुसाट पळून पसार झाले. तसेच कळगाव नदीपात्रातून अवैध रेती उत्खननाचे तराफे नष्ट केले. दरम्यान, पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT