File Photo
परभणी

पूर्णा : प्रधानमंत्री घरकूल योजनेतील अग्रीम हप्ता अनुदानाचा बोजवारा

पूर्णा पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची उदासीनता

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : येथील पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर असलेल्या असंख्य लाभार्थ्यांना नोंदणी करुनही ग्रामीण टप्पा-२ कार्यक्रम वर्ष २०२४-२५ नुसार पहिला हप्ता १५००० रुपये अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही. पूर्णेच्या ग्रामीण भागातील ७९ ग्रामपंचायत‌ नियंत्रणाखाली एकूण ५३३२ उदिष्टांपैकी सध्या ४५७४ घरकूल मंजूर झाले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार २२ फेब्रुवारी रोजी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीने कार्यक्रम घेवून लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचे आदेशपत्र वाटप करण्यात आले. त्यातील पहिला टप्पा म्हणून २३०० लाभार्थ्यांना आधारबेस डिबीटी लिंक बँक खात्यात त्याच दिवशी सरकारने पहिला अग्रीम हप्ता म्हणून १५००० हजार रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केली. यात काहींना हप्ता वर्ग झाला तर असंख्य लाभार्थ्यांना अद्याप तो मिळाला नाही.

बँक आयएफसी कोड चुकीचा दर्शविल्यामुळे त्याची परत चुकीची दुरुस्ती करुन शासनाच्या मान्यतेकरीता प्रधानमंत्री आवास योजनेच्या सबंधीत ईमेलवर यादी पाठवण्यात आल्याची माहिती घरकूल कक्षातील कर्मचारी गणेश पवार यांनी दिली. परंतू अजूनही अग्रीम हप्ता अनुदान मिळाले नसल्याची ओरड सबंधित लाभार्थ्यांतून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे ही प्रक्रिया थंडावली आहे. सदर योजनेचा बोजवारा उडाल्याची ओरड लाभार्थी वर्गातून होत आहे. याकडे पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे घरकूल बांधकामास मोठा विलंब लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT