गंगाखेड येथील ४०० वर्षांची परंपरा असलेल्या प्रति बालाजी दसरा महोत्सवाला सुरूवात झाली. Pudhari Photo
परभणी

गंगाखेड येथील ४०० वर्षांची परंपरा असलेल्या प्रति बालाजी दसरा महोत्सवाला सुरूवात

पुढारी वृत्तसेवा
प्रमोद साळवे

गंगाखेड : सुमारे ४०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला व संपूर्ण भारतभरात दक्षिण काशी गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीच्या काठावरील प्रती बालाजी म्हणून ख्याती असलेल्या श्री बालाजी मंदिर संस्थानच्या दसरा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक दसरा नवरात्र उत्सवास गुरूवार (दि.२६) पासून प्रारंभ झाला आहे. (Navaratri 2024)

भोई समाजाला पालखीचा मान

येथील श्री बालाजी मंदिराची नोंद तिरुमला तिरुपती देवस्थानच्या ग्रंथात 'खेटकपूर' नावाने उल्लेखित आहे. तसेच महाराष्ट्रातील एकमेव श्री बालाजी मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे. गुरूवार (दि.२६) पासून श्री गणेशाच्या पालखीने दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. मंदिरातील दसरा महोत्सवाची पालखी (वाहन) उचलण्याचा मान शहरातील भोई समाजाचा आहे. बालाजी मंदिरातून निघालेली विड्याची पालखी बाजारपेठेतून कुंदेश्वर मंदिर, पाठक गल्ली मार्गे परत मंदिरात येते. या दसरा महोत्सवांमध्ये शहरातील राजेंद्र, चौधरी, शेटे, लव्हाळे, पाठक, महाजन, दलाल, तमखाने आदी घराण्यांना मानकरी म्हणून मोठा मान आहे. तर बारा बलुतेदारातील एकूण ३२ घराण्यांना मानाचा विडा देऊनच दसरा महोत्सवातील कामांची संयुक्त जबाबदारी दिली जाते. (Navaratri 2024)

हजारो भाविकांची उपस्थिती

घटस्थापनेपासून ध्वजवाहन पालखी निघते. त्यानंतर श्री बालाजीच्या उत्सव मूर्तीची नाग वाहन, मोर वाहन, वाघ वाहन, सोंड हल्या हत्ती वाहन, पालखी, अंबारी हत्ती वाहन, सूर्य वाहन, चंद्र वाहन, मारोती वाहन, गरुड वाहनातून गावाची प्रदिक्षणा केली जाते. तर दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी (दि.१२ ऑक्टोबर) ३० फुटी उंचीच्या रथातून श्री बालाजीच्या मूर्तीची गाव प्रदिक्षणा केली जाते. या रथ प्रदिक्षणेत सहभागी होण्यासाठी रथाची दोर ओढण्यासाठी सहभागी होण्यासाठी देशभरातील राज्य व परराज्यातून हजारो भाविक गंगाखेड शहरात येत असतात. (Navaratri 2024)

कोजागिरी पोर्णिमेला दसरा महोत्सवाची सांगता

'व्यंकट रमणा गोविंदा..गोविंदा' च्या जयघोषात हा रथ काढला जातो. रस्त्याच्या दुतर्फा असलेले भाविक रथावर बत्तासे व फुले उधळत रथाचे स्वागत करतात. या प्रदिक्षणेनंतर अश्व वाहनाची शहरभरातून प्रदिक्षणा होते. या दसरा महोत्सवाची सांगता गोविंदराज यांना पोशाख परिधान केल्यानंतर कोजागिरी पोर्णिमेच्या दिनी दीपोत्सवाने होते.

गोपाळराव खारकर कुटुंबियांची ९० वर्षांपासून सेवा

मागील ९० वर्षापासून श्री बालाजी संस्थानचे विश्वस्त व सेवेकरी म्हणून ८० वर्षीय गोपाळदेव खारकर व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय अहोरात्र सेवा करून परिश्रम घेत असतात. खारकर कुटुंबीयांना शहराच्या धार्मिक क्षेत्रात मोठा मान आहे. या संपूर्ण ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जबाबदारी एकटे खारकर कुटुंबीय नित्यनियमाने निर्विघ्नपणे पार पाडतात.

रावण दहनालाही २४ वर्षाची परंपरा !

येथील दसरा महोत्सवात गोदातीरावर मागील २४ वर्षापासून रावण दहन महोत्सवाने सांस्कृतिक व धार्मिक रंजकता आणली आहे. रावण धरणाचे यावर्षीचे २४ वे वर्ष आहे. ऐतिहासिक रथाच्या मिरवणुकी नंतर गोदाकाच्या नयनरम्य व निसर्ग रम्य वातारणार सायंकाळी आठच्या सुमारास मागील २२ वर्षांपासून साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक, पारंपारिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा रावण दहन सोहळा साजरा होत आहे. यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमांसहित नयनरम्य आतिषबाजीत रावण दहन सोहळा साजरा होणार असल्याची माहिती संयोजक तथा साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव व सचिव नागेश पैठणकर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT