'प्रहार'च्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयाच्या पायरीवर बसून मुंडण आंदोलन केले.  (Pudhari Photo)
परभणी

Purna Protest | पूर्णा येथे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ 'प्रहार'च्या कार्यकर्त्यांचे मुंडण आंदोलन

तहसील कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करून नोंदवला राज्य सरकारचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

 Prahar Janshakti Party Protest in Purna

पूर्णा : प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पूर्णा तहसील कार्यालयासमोर आज (दि. १३) मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसिल कार्यालयाच्या पायरीवर बसून मुंडण केले.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांग, विधवांना मानधन द्यावे, घरकूल योजना राबवावी, अशा १४ मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे यांना देण्यात आले.

शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुती सरकारने पाळले नसल्यामुळे माजी मंत्री तथा प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावतीमधील मोझरी येथे मागील सहा दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे पूर्णा तालुक्यातील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंडण करुन शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी प्रहारचे तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, संजय वाघमारे, टोपक्या भोसले, श्रीहरी ईंगोले, तुकाराम पारवे, जगन्नाथ नवघरे, रमेश जाधव, भागवत पिसाळ, शहाजी दिवटे, विठ्ठल पिसाळ, छत्रपती वाघ, केशव पारवे, शिवाजी वंजे, श्याम सोळंके, नामदेव बनसोडे, जानकीराम लोंढे, विठ्ठल बुचाले, शरद कदम, राम सुके, मंचक वैद्य‌ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग कारागीर रामदास वाघमारे यांच्या हस्ते मुंडण करुन घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT