Pathri Selu road auto truck collision
पाथरी : पाथरी-सेलू रस्त्यावर देवनांद्रा येथील रेणुका साखर कारखाना परिसरात आज (दि. ५) सायंकाळी साडेचार वाजता ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ऑटोमधील एक प्रवासी जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव रमेश रामभाऊ आव्हाड (वय ५०, रा. देवगाव) असे आहे. तर जखमी माणिक बाबुराव काळे (रा. देवगाव) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पाथरीहून तातडीने परभणीच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो (क्र. एमएच २२ यू ८१५) देवगावहून पाथरीकडे येत असताना, ट्रक (क्र. एमएच ४४-२५७१) पाथरीहून सेलूकडे जात होता. यावेळी देवनांद्रा गावाजवळील पाटी परिसरात हा अपघात झाला. या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश लांडगे, पोलिस उपनिरीक्षक एस.ओ. शेळके, हवालदार एस.एन. लोखंडे, एम.ए. मुजमुले, पोलिस अंमलदार विष्णू वाघ यांनी तातडीने धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले आणि पुढील तपास सुरू केला आहे.