पाथरी शहर कडकडीत बंद Pudhari File Photo
परभणी

परभणी : माजी आ. दुर्राणी यांच्यावर गुन्हा नोंद प्रकरणी पाथरी शहर कडकडीत बंद!

समर्थकांनी रॅली काढत प्रशासनाला निवेदन दिले

पुढारी वृत्तसेवा

माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.13) पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर गुन्हा नोंद केल्याप्रकरणी त्यांच्या समर्थकांनी निषेध दर्शवला आहे. यावेळी निषेध दर्शवत समर्थकांनी केलेल्या आवाहनानंतर पाथरी शहरात बुधवारी (दि.14) सकाळ पासुन कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळी फीत शहरातून शांततेत रॅली काढत माजी आ.दुर्राणी यांच्यावरील दाखल गुन्हे प्रशासनाला मागे घेण्यासंदर्भात मागणी केली आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात

शहरातील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण कांबळे यांचा मृतदेह मंगळवारी (दि.13) सकाळी त्यांच्या शेतातील आखाड्यावर आढळून आला होता. यानंतर याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती . दुपारी पाथरी पोलिसांनी पंचनामा दरम्यान मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळल्यानंतर आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शहरातील विजय प्रभाकर वाकडे रा .भीमनगर यांच्यावर पाथरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर पाथरीमध्ये कमालीची तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी संध्याकाळी नऊ वाजता दुर्राणी यांच्या समर्थकांनी बुधवार १४ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी बंद ठेवण्याचे आवाहन केले होत. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच शहरातील सर्वच बाजारपेठ बंद राहत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही सुरू आहे

त्याप्रकरणी शिंदे गटाचा काही संबंध नाही : सईद खान

शहरातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक बी एस कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणाशी शिंदे गटाचा काही संबंध नसल्याचे शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जबरदस्तीने पाथरी बाजारपेठ बंद करणारे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अरिफ खान यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी शिवसेनेच्या वतीने यावेळी मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या माजी आमदार बाबाजी दुरानी यांना अटक करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचेही यावेळी सईद खान यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT