मानवत, पुढारी वृत्तसेवा : गावाकडे मोटरसायकलवरून येणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. विकास प्रभाकर टाक ( वय ३०, रा. केकरजवळा) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पाथरी ते पोखर्णी रोडवर मंगळवारी (दि.७) रात्री ९ च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विकास मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास मोटारसायकलवरून (एम एच २२ ए आर ०२५६ ) केकरजवळा येथे आपल्या घरी जात होता. पाथरी ते पोखर्णी रोडवर केकरजवळा शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच मृताचा भाऊ ईश्वदीप टाक, रोहन कौशल्य, ज्ञानेश्वर आरसुळ तसेच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, सहायक पोलीस निरीक्षक खिल्लारे व पोलीस नाईक सिद्धेश्वर पालवडे यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी ईश्वदीप टाक (वय २५) याने फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.