Marathwada Vidarbha route closed
जिंतूर : पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी तसेच सिद्धेश्वर धरणाच्या पाणी साठ्यात जोरदार पावसामुळे वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज (दि 28) येलदरी धरणाचे पाणी पातळी 461.680 मीटर झाली. पाणीसाठा 942.695 दलघमी व टक्केवारी 98.90 इतकी झाली आहे. याप्रमाणे सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 461.680 मीटर झाली असून पाणीसाठा 924.695 टक्केवारी 98.90 % इतकी झाली आहे. सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 412.880 मीटर झाली असून पाणीसाठा 246.755 व टक्केवारी 94.14 इतकी झाली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होणारे पर्जन्यमान तसेच उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातील पाण्याचा पाण्याची आवक पाहता धरण सुरक्षितेच्या दृष्टीने येलदरी व सिद्धेश्वर धरणातील उपलब्ध पाणी पातळी तथा पाणीसाठा राखीव ठेवून आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता येलदरी धरणातून साधारणता 38 हजार 180 क्युसेक्स (911) क्यूमेक्स पाणी तसेच सिद्धेश्वर धरणातून सकाळी आठ वाजता 25,638 क्यूसेक्स (725.98) क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
पूर्णा प्रकल्पाच्या भागातील खडकपूर्णा धरणातून 87 हजार 340 ने पाण्याचा विसर्ग सोडण्याबाबत प्राप्त संदेशानुसार तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील प्रजन्यमानामुळे धरणातील आवक लक्षात घेता धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता वक्रद्वारांचा विसर्ग वाढवून (44 हजार 750 क्युसेक्स),(1267.16 क्यूमेक्स) करण्यात आला आहे.
वाढलेल्या विसर्गामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर:शेनगाव रस्त्यावरील येलदरी धरणा खालील असलेला पूल हा पाण्याखाली जाणार असल्यामुळे दिनांक 28 सप्टेंबर 2025 दुपारी दोन वाजले पासून वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. अशा सूचना कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत यांनी जिल्हाधिकारी परभणी, नांदेड,हिंगोली,यांना कळवले आहे. तसेच औंढा, जिंतूर रस्त्यावरील पुलाबाबत खबरदारी घेऊन आवश्यक्य नुसता मार्ग बंद बाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे अशाही सूचना दिलेले आहेत.