ताडकळस : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत ताडकळस येथे मतदार पडताळणी व SIR फॉर्म वाटपाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार माधवराव बोथीकर व नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी बीएलओ संजय सोनकांबळे व पठाण मॅडम यांच्याकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच उपस्थित मतदारांशी संवाद साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक पात्र मतदाराने बीएलओंना सहकार्य करून फॉर्म वेळेत भरावेत, जेणेकरून कोणाचाही मतदानाचा हक्क वंचित राहणार नाही, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
निवडणूक आयोगाच्या या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील मयत, स्थलांतरित व डुप्लिकेट नावे वगळून पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जात आहेत. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घराघरांत जाऊन माहिती संकलित करीत आहेत. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर दावा व हरकती स्वीकारून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी खिल्लारे, बालासाहेब आंबोरे,बीएलओ संजय सोनकांबळे, बीएलओ पठाण मॅडम, शमीम पठाण, महसूल सेवक प्रल्हाद कानडे, नामदेव कळसाईतकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.