पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातील सत्यभुवन हॉटेलसमोर बेकायदेशीररित्या धारदार तलवार बाळगणाऱ्या तिघांना पूर्णा पोलिसांनी पकडले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि.७) रात्री करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात असलेल्या सत्यभुवन हॉटेल समोर रविवारी रात्री ८.२० च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याचे गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन तरुणाला शस्रासह पकडून अटक केली. त्यांच्याकडून ३ हजार रुपये किंमतीची लोखंडी स्टीलची तलवार, ८० हजारांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
अवैधरित्या शस्र बाळगल्या प्रकरणी पोलिस ठाण्यातील मंगेश जुक्टे यांनी तक्रार दाखल केली. शहरातीलच रहिवाशी असलेले तिघे जण आरोपी धारदार तलवार बाळगताना आढळून आले. त्यांची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद क-हाळे करीत आहे. तिघांना पूर्णा येथील न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा