Tadkalas sandalwood tree cutting
ताडकळस : ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तटुजवळा फाटा (ता. परभणी) येथील शेतशिवारात चंदनाची अवैध कटाई करून अंदाजे 64, 400 रुपयांचे चंदन लाकूड वाहतूक करताना सहा आरोपींना ताडकळस पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 18) करण्यात आली.
पोलिसांनी पकडलेले आरोपी असे मेहताब खॉ अहमद खॉ पठाण (45, रा. कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली), सय्यद अहमद सय्यद मुर्तुजा (36, रा. कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली), शेख आलीम शेख जानी (32, रा. वसमत, जि. हिंगोली), शेख कलीम शेख पाशा (रा. कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली), बबलु खदीर शेख (रा. वसमत), शेख फारुक शेख लतीफ (रा. कुरुंदा, ता. वसमत) यांना ताब्यात घेण्यात आले.
यांच्याकडून चंदन लाकूड किंमत 64, 400 रुपये, तीन लोखंडी कुऱ्हाडी, धार देण्याचे साहित्य, मोटारसायकल (MH 26 U 5593) असा 1,24,800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी शासनाने बंदी घातलेल्या चंदनाची अवैध तोड करून आरोपी क्रमांक 4 ते 6 यांना विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश तायडे व रणेर करत आहेत. मोटारसायकलसह तिन्ही प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.