ताडकळस: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. दरम्यान दलालांचा सुळसुळाटाला देखील या शाखेचे ग्राहक व शेतकरी वैतागले आहेत.
जि.म.स. बँक ताडकळस (ता.पुर्णा) शाखेमार्फत शासनाच्या विविध योजना जसे कि , संजय गांधी निराधार योजना , वृद्ध , दिव्यांग , परितक्त्या, विधवा यांना अनुदान वाटप होत असते. मुख्यमंञी लाडकीबहिण योजना तसेच शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, असे विविध प्रकारचे या शाखेमार्फत वाटप होत असते. नुकतेच येथे अतिवृष्टी व रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना अनुदान वाटप होत आहे.
ताडकळस व परिसरातील शेतकरी बँकेत गेले असता एका तासात रक्कम संपली असे नेहमीच सांगून नागरिकाना परत पाठविले जात आहे. ताडकळससह परीसरातील अनेक गावातील शेतकरी खातेदार आहेत. त्यांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागतात. बँकेतील रक्कम संपल्याचे नाटक करून आपल्या मर्जीतील लोकांना मागच्या बाजूने रक्कम दिली जाते खाजगी व्यक्तींच्या मार्फत चिरीमिरी घेत अनेक मर्जीतील शेतकऱ्यांना रक्कम दिल्या जात असल्याचे प्रकार नेहमी घडत आहेत. एखाद्या शेतकऱ्यांकडून तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास येथील कर्मचारी अरेरावीची उद्धट भाषा वापरली जाते. बँकेतील कर्मचाऱ्याच्या अशा मनमानीला कारभाराला ताडकळस व परिसरातील बँकचे ग्राहक, शेतकरी, नागरिक वैतागले आहेत.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरीष्ठ अधिकारी वर्गानी ताडकळस येथील शाखेतील होत असलेला गैर प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर योग्यती कारवाई करावी असी मागणी करण्यात येत आहे. ताडकळस येथील शेतकरी आशोक नारायण राव सासवडे यांनी दि 14 नोव्हेंबर 2025 रोजी एका लेखी निवेदनाद्वारे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाकडे केली आहे. या शाखेत नेहमीच दलालांचा सुळसुळाट झाला आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील का? या बँकेतील व्यवहार सुरळीत होतील का ? असा प्रश्न आहे.