पवन गोरे  Pudhari
परभणी

Parbhani Accident | पूर्णा-नांदेड महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

चुडावा येथे भीषण अपघात; आनंदनगर परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Purna Nanded Highway Accident

पूर्णा : पूर्णा-नांदेड महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, चुडावा गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २० ) रात्री साडेनऊच्या सुमारास राज धाब्याजवळ हा अपघात घडला. पवन एकनाथ गोरे (वय २८, रा. आनंदनगर, पूर्णा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे पूर्णा शहरातील आनंदनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन गोरे हा नांदेड येथील काम आटोपून दुचाकीवरून पूर्णाकडे परतत होता. चुडावा गावाजवळील राज धाब्याच्या परिसरात त्याच्या दुचाकीची ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरशी जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, पवनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पवनला तातडीने पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुण वयात झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी सिंगणवाड यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल मिटके, जमादार आनंदा तोटेवाड, पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधव व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही वाहने पोलिसांनी ठाण्यात जमा केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास जमादार आनंदा तोटेवाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT