Sonpeth incident
सोनपेठ : तालुक्यातील वणीसंगांमध्ये कृष्णा दिलीप पायघन या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही धक्कादायक शनिवारी (दि.२२) सकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिलीप पायघन यांनी सोनपेठ पोलिस स्टेशनमध्ये खबर दिल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरूणाने उचलेल्या या टोकाच्या घटनेमागील कारण समोर आलेले नाही. सोनपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार कुंडलिक वंजारे करत आहेत.