सोन्ना येथील सोमदत्त मगरने सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.  Pudhari News Network
परभणी

CA final result 2024 |सोन्ना येथील शेतकरी मुलाचे सोनेरी यश: सोमदत्त मगर सीए परीक्षेत चमकला

सोमदत्त मगरवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

सेलू, पुढारी वृत्तसेवा: सोन्ना (ता. सेलू) येथील शेतकरी तथा वारकरी सांप्रदायाचा वारसा व परंपरा लाभलेले दत्तराव महाराज मगर यांचे चिरंजीव सोमदत्त मगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या सीए ( सनदी लेखापाल ) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

Summary

  • सोमदत्तचे माध्यमिक शिक्षण सेलू येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले.

  • उच्च माध्यमिक शिक्षण नूतन महाविद्यालयात झाले.

  • सोमदत्तच्या यशामुळे ग्रामीण भागातील मुलासमोर नवा आदर्श

ग्रामीण भागातील मुलासमोर एक नवा आदर्श

सोमदत्तचे माध्यमिक शिक्षण सेलू येथील न्यू हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण नूतन महाविद्यालयात झाले. सोन्ना सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी व वारकरी कुटुंबातून उच्च शिक्षण घेऊन यश संपादन करून त्यांनी ग्रामीण भागातील मुलासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सोमदत्तच्या आई- वडिलांचा शेती व्यवसाय आहे. मगर परिवाराला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पायी दिंडीचे नेतृत्व हभप दत्तराव महाराज सोन्नेकर करतात. पांडुरंगांची निस्सीम भक्ती करणारे कुटुंब म्हणून मगर परिवार पंचक्रोशीत परिचीत आहे.

सोमदत्त मगरचे सर्व स्तरातून कौतुक

सोमदत्तला अरविंद निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल पांडुरंगराव मगर, गोविंदभाऊ जोशी, श्रीबल्लभ लोया, मोकिंदराव झोडगावकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, संजय मगर, सुनिल डख, प्रा. विनायक मगर, प्रा. दिगंबर मगर, शरद मगर, राजेभाऊ मगर, संजय वाघ, भरत रोडगे, न्यू हायस्कूल परिवार व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT