३८ मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटसह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली  Pudhari
परभणी

Purna Municipal Election | पूर्णा नगरपरिषद निवडणूक : ३३ हजार ७७६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

११ प्रभागांसाठी नगराध्यक्ष पदाचे १४ आणि नगरसेवक पदाचे ११० उमेदवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra local body elections

पूर्णा : पूर्णा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबररोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून शहरातील ११ प्रभागांमधील ३३,७७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये थेट नगराध्यक्ष तसेच एकूण २१ नगरसेवकांची निवड होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निर्णय अधिकारी माधवराव बोथीकर, वरिष्ठ प्रशांत थारकर आणि पंढरीनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४०० कर्मचारी सज्ज झाले आहेत. शहरातील एकूण ३८ मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटसह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली असून सोमवारी (दि.१) ती केंद्रांकडे रवाना करण्यात आली. तहसील कार्यालयात यंत्र तपासणी व वितरणाची मोठी धांदल पहायला मिळाली.

दरम्यान, मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, पोलीस उपअधीक्षक. डॉ. समाधान पाटील आणि पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी तहसीलदार बोथीकर यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत; १४ उमेदवार रिंगणात

नगराध्यक्ष पदासाठी यावेळी १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रेमला संतोष एकलारे, यशवंत सेना–पूर्णा शहर विकास आघाडीच्या विमल लक्ष्मण कदम, शिवसेना (शिंदे)–भाजपा युतीच्या विमल कापसे, वंचित बहुजन आघाडीच्या आम्रपाली जोंधळे आणि काँग्रेसच्या शेख हसीना बेगम या प्रमुख दावेदारांचा समावेश आहे. शहरात खरी लढत प्रेमला एकलारे आणि विमल कदम यांच्यातच होण्याची चर्चा आहे.

नगरसेवक पदासाठी ११० उमेदवार मैदानात असून काही प्रभागात पक्षीय तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांचे वर्चस्व दिसत आहे. समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जोमाने प्रचार सुरु आहे.

प्रभागनिहाय मतदारसंख्या

३१२०

२२७८

२३१४

२६८१

२४६१

३६९८

३७९७

२६१२

५०४७

२४३०

३३२८

सभांपासून डोर-टू-डोरपर्यंत प्रचाराचा जोर

मागील चार–पाच दिवसांत शहरात आमदार व नेत्यांच्या सभा, कॉर्नर मीटिंग, रॅली तसेच डोर-टू-डोर भेटीद्वारे उमेदवारांनी मतदारांना साधण्याचा प्रयत्न केला. वाहनांवरील लाऊडस्पीकर, प्रचारगीते, विविध आकर्षक युक्त्या वापरत प्रचाराचा जोर वाढवण्यात आला.

काही उमेदवारांनी पैशाचा प्रभाव दाखवल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये कानोकानी रंगल्या; मात्र नियंत्रणासाठी असलेली भरारी पथके मात्र कमी सक्रिय असल्याचे दिसून आले. उमेदवारांनी मतदारांशी जवळीक साधण्याचा आटापिटा केला, तर काही ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना दुय्यम वागणूकही मिळाल्याचे पाहायला मिळाले. एकूणच पूर्णा नगरपरिषद निवडणूक यावेळी रंगतदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT