Purna Shiv Sena Thackeray group
पूर्णा: पूर्णा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ रणधुमाळी आता सुरू झाली असून गुलाबी थंडीत राजकारण तापू लागले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मविआकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला असून प्रेमला संतोष एकलारे या नगराध्यपदाच्या उमेदवार असतील.
12 नोव्हेंबर रोजी शहरातील जुना मोंढा येथील श्रीराम मंदिरात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार संजय जाधव, मधुसूदन केंद्रे, माजी नगराध्यक्ष साहेब कदम, मनोज काकानी, शहराध्यक्ष मुंजाभाऊ कदम, हिराजी भोसले, प्रा. गोविंद कदम, राजू अण्णा एकलारे, श्याम कदम, प्रमोद एकलारे, शंकर गलांडे, मनोज उबाळे, गजानन हिवरे, मेहबूब कुरेशी, शेख आमीन, रवी चिटणीस, पप्पू मुथा, रवी जयस्वाल, मुंजा दर्गू हे उपस्थित होते.
खा. संजय जाधव म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नेहमीच जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी लढत आली आहे. गेल्या नगर परिषद निवडणुकीत संतोष एकलारे यांच्या मातोश्री गंगाबाई एकलारे यांना शहरवासीयांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. प्रेमला एकलारे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून पुढे करत आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर नव्या विकासावर वाटचाल करील.
या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. एकीकडे ‘मविआ’ने उमेदवार जाहीर केला असला तरी इतर पक्षांचे उमेदवार मात्र अद्याप जाहीर केलेले नाहीत.