Drought Affected Soybean Burned Pudhari
परभणी

Drought In Parbhani | कोरड्या दुष्काळात वाळलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी केली होळी

पूर्णा तालुक्यातील कमलापूरातील संतापजनक प्रकार; तीन-चार एकरांतील पीक जाळून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

पुढारी वृत्तसेवा

Drought Affected Soybean Burned

पूर्णा : पावसाने दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचा फटका बसलेल्या पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे शेतकऱ्यांनी वाळून गेलेल्या सोयाबीन पिकाची अक्षरशः होळी केली. बुधवारी (दि. २३) गट क्रमांक ४७ मधील सुमारे तीन ते चार एकरांवरील वाळलेले सोयाबीन कापून एकत्र केल्यानंतर ते जाळून टाकण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

शेतकरी व्यंकटी गोविंद मोरे, केशवराव मोरे आणि चंद्रकलाबाई यांनी हे पीक वाळून गेल्याने त्याचा उपयोग तरी काय, असा सवाल करत संताप व्यक्त केला. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. उभे पीक वाळून गेल्याने केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळली आहे.

या घटनेमुळे कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचे विदारक चित्र समोर आले आहे. पिके हातची गेली असताना शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत, अनुदान आणि पीकविमा भरपाईबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जात असली, तरी प्रत्यक्ष मदतीबाबत ठोस निर्णय होत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. “केवळ आश्वासने नकोत, तातडीने मदत जाहीर करा,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT