पूर्णा, : तालूक्यातील एकूण १२ पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत ता १३ अक्टोबर रोजी तहसिल कार्यालयात जाहीर करण्यात आली. यात, एरंडेश्वर गण:-सर्वसाधारण प्रवर्ग (महिला), आहेरवाडी:-सर्वसाधारण प्रवर्ग (महिला), चुडावा:अनूसुचित जाती (महिला), देगाव:नागरीकांचा मागास प्रवर्ग, कावलगाव:-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), धानोरा मोत्या:नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), गौर:-सर्वसाधारण प्रवर्ग, धनगर टाकळी:-सर्वसाधारण प्रवर्ग, ताडकळस: अनुसूचित जाती, फुलकळस: सर्वसाधारण प्रवर्ग, वझूर: सर्वसाधारण प्रवर्ग, देवूळगाव दुधाटे:-सर्वसाधारण प्रवर्ग (महिला). या प्रमाणे आरक्षण सोडत झाली आहे.
दरम्यान, यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या नियंत्रणाखाली तहसीलदार माधवराव बोथीकर यांचे अध्यक्षतेखाली खाली आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रसंगी ना तहसीलदार निवडणूक पंढरीनाथ शिंदे, उज्वला पुल्लेवार यांच्या सह नागरीक उपस्थित होते.
सोनपेठ सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित
तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी साठीची आरक्षण सोडत दि १३ ऑक्टोबर रोजी स ११ वाजता तहसील कार्यालय सभागृह येथे पार पडली. सोनपेठ पंचायत समिती सभापती अ. जा. साठी आरक्षित असल्यामुळे एकमेव आरक्षित असलेल्या उखळी बु पं. स गणातून निवडून येणारी महिला ही भावी पंचायत समिती सभापती पदी विराजमान असणार आहे. ही आरक्षण सोडत मा उपजिल्हा अधिकारी निवडणूक अरुणा संगेवार यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. या आरक्षण सोडतील मा तहसीलदार सुनील कावरखे, गट विकास अधिकारी प स सोनपेठ मधुकर कदम,नायब तहसीलदार निवडणूक रेड्डी, कोठुळे, अव्वल कारकून गिनगिने,देशमुख, महसूल सहाय्यक हनुमंत फड तांत्रिक सहाय्यक माऊली घाडगे,पो नि अंकुश गीते, पोउनि भूषण कांबळे, पो हे कॉ वावधाने, पो कॉ तिडके व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली आरक्षण सोडत १० वर्षाचा हरिप्रसाद भिमसिंग ठाकूर शेळगाव या मुलाच्या हस्ते चिट्ठी उचलून काढण्यात आली.
उखळी बु ७२ गन हा अ जा ( एस सी)महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. शिरशी बु ७० गण हा ना मा प्र( ओबीसी ) आरक्षित झाला आहे डिगोळ ई सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. तर उर्वरित नरवाडी-,७१ वडगाव-७२,शेळगाव:-६९ हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहेत.