परभणी

Parbhani News | सावरगाव तांडा येथे पोलिसांचा छापा; ७३ हजारांच्या मुद्देमालासह देशी दारूचे ६ बॉक्स जप्त

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : चारठाणा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (LCB) शनिवारी सायंकाळी सावरगाव तांडा परिसरात मोठी कारवाई केली. जोगवाड्याकडून चारठाण्याकडे दुचाकीवरून बेकायदेशीररित्या नेले जाणारे देशी दारूचे ६ बॉक्स पोलिसांनी पकडले असून, या कारवाईत एकूण ७३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शनिवारी (२८ मार्च) सायंकाळी ६:५० च्या सुमारास सावरगाव तांडा येथील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी जोगवाड्याकडून चारठाण्याकडे येणारी दुचाकी (क्रमांक: MH 22 AR 5784) पोलिसांनी थांबवली. तपासणी केली असता, दुचाकीवर देशी दारूचे ६ बॉक्स आढळून आले.

जप्त केलेला मुद्देमाल:

  • देशी दारू: ६ बॉक्स (किंमत २३,०४० रुपये)

  • दुचाकी: ५०,००० रुपये

  • एकूण किंमत: ७३,०४० रुपये

दोषींवर कारवाई

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार माणिक डुकरे यांच्या फिर्यादीवरून, नागनाथ बाबुराव गायकवाड आणि राजू प्रकाश पवार (दोघेही राहणार चारठाणा) यांच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे मुकेश बुधवंत, पांडुरंग खूप सुंदर, माणिक डुकरे आणि देवगाव बीटचे एच.पी. गायकवाड यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार एच.पी. गायकवाड पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT