Chudawa Police Gambling Raid Pudhari
परभणी

Purna Crime | आलेगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १० जणांना अटक; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

चुडावा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Chudawa Police Gambling Raid

पूर्णा : तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आलेगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकून मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १० जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख १७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई आलेगाव शिवारातील गोपीनाथ सवराते यांच्या शेतात झाडाखाली काही जण 'तिर्रट' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या १० जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.

असा आहे जप्त मुद्देमाल:

  • नगद रोकड: २२,६३० रुपये

  • मोबाईल संच: ७०,००० रुपये (अंदाजे)

  • इतर साहित्य: जुगाराचे पत्ते, साहित्य व वाहने

  • एकूण किंमत: ४,१७,६३० रुपये

याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि प्रभाकर कच्छवे पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संतापजनक: पिंपळगाव शिवारात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नराधम शुभम भालेराव विरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव लिखा शिवारात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम आरोपीविरुद्ध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार अत्याचार केल्याचा आरोप हिंगोली जिल्ह्यातील हट्टा (ता. वसमत) येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलीवर शुभम शंकरराव भालेराव (रा. कोलंबी, जि. नांदेड) याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. १८ मार्च रोजी पहाटे ५ वाजेपूर्वी आणि त्याआधीही विविध वेळी आरोपीने पिंपळगाव शिवारात पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चुडावा पोलिसांनी शुभम भालेराव याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सपोनि सुशांत किनगे या संवेदनशील प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT