जखमी नानाराव कापूरे.  pudhari photo
परभणी

परभणी : पांगरा येथे जिप मालकावर प्राणघातक हल्ला

Deadly attack: डोक्यात कत्तीने वार करुन केले गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : तालूक्यातील पांगरा लासीना येथे ता ८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास एका ५८ वर्षीय जिपमालकावर गावातीलच प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेटॉडोर ऑटो चालकाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी नंबराच्या कारणावरुन चिडून जात डोक्यात कत्तीने वार करत प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जिपमालक व्यक्तीस नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील पांगरा तर्फे लासीना येथील जिपमालक नानाराव भिवाजी कापूरे (वय अंदाजे ५८ वर्ष) हे गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला त्यांच्या जिपमधून पूर्णा शहरात वाहतूक करताना त्यांच्या नंबर मधील काही शेतकरी नागरीकांना गावातीलच भावकीच्या एका मेटॉडोर ऑटो चालकाने आपल्या ऑटोत बसवून गावाकडे नेले. यावरुन नंबर असताना माणसं का ऑटोत बसवून नेले? असा जाब जिपमालक नानाराव भिवाजी कापूरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गावात आल्यावर विचारला.

जाब विचारल्यानंतर गावातील ऑटो चालक लखन प्रकाश कापूरे याने चिडून जात नानाराव कापूरे यांच्या डोक्यात व शरिरावर कत्तीने वार करुन जिवघेणा प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमीस नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या घटनेची माहिती चुडावा पोलीसांना कळवली आहे. दरम्यान,जखमी व्यक्तीचा दवाखान्यात जवाब घेतल्यानंतर प्राणघातक हल्ला करणा-या या ऑटो चालका विरुद्ध गुन्हा दाखल होईल, असे चुडावा येथील पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT