जिंतूर: ओबीसी समाजा तर्फे बंद बाबत प्रशासना सोबत चर्चा झाल्या नंतर चर्चेत भूमिका मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला होता. तर आज प्रशासनाने सकल ओबीसी समाजाला उद्देशून प्रातिनिधिक स्वरूपात ॲड. सुनिल बुधवंत यांना एक विनंती रुपी पत्र देऊन बंद स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच समाज बांधवांच्या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला कळवण्यात आलेल्या असून सरकार योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिलेले आहे.
त्याचबरोबर बंद ठेवल्यास व्यापारी, गाडेवाले, शेतकरी, छोटे दुकानदार तसेच ज्यांचे पोट हातावर आहे अशा लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून जिंतूर शहर बंद न करण्याचे आवाहन केले आहे. तर ओबीसी समाजातील तरुण तसेच जेष्ठ मंडळींची प्रशासनास तसेच व्यापाऱ्यांना, गाडेवाल्यांना, शेतकऱ्यांना, दुकानदारांना त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सहकार्य करण्याची भूमिका आहे.म्हणून दि. 17 जानेवारी 2025 रोजीचा नियोजित बंद स्थगित करण्यात आला आहे.