पूर्णा : तालूक्यातील पिंपळा भत्या येथील श्री क्षेत्र गोपाळ चावडी व श्री कृष्ण मंदिर येथील विकास करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये निधी मंजूरीस नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी कळवली आहे. सदरील ३ कोटी रुपये निधीतून गोपाळचावडी मंदिर परिसर अंतर्गत असलेल्या भक्त निवास बांधकामासाठी १ कोटी रुपये, तेथील संरक्षण व पेवर ब्लॉक बसवणे १ कोटी रुपये, सोलार पथदिवे बसवणे ५० लाख रुपये, सोलार हायमास्ट व पथदिवे बसवणे ५० लाख रुपये,असा मिळून विविध विकास कामाकरीता एकूण ३ कोटी रुपये निधी मंजूरीस प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
दरम्यान, पूर्णा तालूक्यातील पिंपळा भत्या गाव शिवाराला लागूनच महानूभव पंथाचे प्रसिद्ध तीर्थश्रीक्षेत्र गोपाळ चावडी श्री कृष्ण मंदिर आहे. येथे आ डॉ. रत्नाकर गुट्टे हे काही दिवसांपूर्वी श्रिंच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी तेथील महानूभव पंथाचे बाबाजी महाराजांनी आमच्या श्रिकृष्ण मंदिर विकासासाठी निधीची अत्यंत आवश्यकता आहे,असी समस्या विषद केली.
त्यावरुन, सदरील श्रिकृष्ण मंदिर विकासासाठी खरच निधीची आवश्यकता असल्याचे आ डॉ. गुट्टे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सरकारकडे प्रयत्न सुरु केले होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून सुमारे ३ कोटी रुपये निधी मंजूरीस सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली.