परभणी

Parbhani News: परभणीमधील एरंडेश्वर येथे विनापरवाना गावठी पिस्टल सह एकाला अटक तर दुसरा फरार

पूर्णा पोलिस अन् स्थागुशाची संयुक्त धाडसी कारवाई; युवकाजवळील एक विनापरवाना गावठी पिस्टल आणि एक पिवळे रंगाचे धातूचा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

Anirudha Sankpal

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा

पूर्णा तालूक्यातील एरंडेश्वर येथे ता १८ सप्टेंबर रोजी ११ वाजता एक जण विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल ताब्यात बाळगून दशहत निर्माण करत असताना त्यास स्थागुशा पथक अधिकारी आणि पूर्णा पोलीसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले.

सदरील युवकाजवळील एक विनापरवाना गावठी पिस्टल आणि एक पिवळे रंगाचे धातूचा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यातील एक आरोपी फरार झाला आहे.सदरील घटनेमुळे एरंडेश्वर गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, सदरील धाडसी कारवाई ही सपोनि सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं?

या बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील एरंडेश्वर येथील हनुमान मंदिरा जवळ ता १८ सप्टेंबर रोजी ११ वाजता आरोपी मुकेश शेषेराव खाडे (वय २२ वर्ष) रा हट्टा ता वसमत जि हिंगोली यांनी आरोपी बुध्दभूषण भगवान खिल्लारे रा आंबेडकर नगर हिंगोली यांच्या कडून गावठी पिस्टल घेवून विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतः च्या ताब्यात बाळगून जिल्हाधिकारी परभणी यांचे शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करुन दशहत निर्माण केली.

आरोपीला अटक

सदरील माहिती पूर्णा पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपी मुकेश खाडे यास शिताफीने पकडून अटक केली. यातील पिस्टल देणारा एक आरोपी फरारी झाला असून पोलीस त्याचा कसून तपास घेत आहेत. सदरील घटनेत एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मिळून ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल

फिर्यादी पोह/१२०९ , रामकिशन ज्ञानोबा काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुकेश शेषेराव खाडे, बुध्दभूषण भगवान खिल्लारे यांच्या विरुद्ध गुरनं ३८८/२०२६ कलम ३/२५,२९ शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन पाटील हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT