परभणी

‘मी बायकोचा खून केला...’; पत्नीची हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

Parbhani crime news | सदर प्रकरणी चारठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या डोक्यात दगड घालून खुन केला. चारठाणा येथे बुधवारी (दि.६) सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सूमित्रा श्रीधर गायकवाड (वय : ३८ वर्ष, रा.चारठाणा ता.जिंतुर) असे मयत महिलेचे नाव आहे.

बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास तिचा पती श्रीधर गायकवाड याने त्याच्या पत्नीला दुचाकीवर बसवले. तेथून अगदी गावाला लागून असलेल्या जिंतुर - जालना महामार्गावरील शेत आखाड्यावरील निवार्‍यावर नेले. तेथे गेल्यावर त्याने त्याच्या पत्नीस काठीने मारहाण केली व त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याची घटना घडली. यात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर संबधित आरोपीने चारठाणा पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहीती पोलीसांना दिली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, बीट जमादार उध्दव माने, उध्दव सातपुते, गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते, आदींनी घटनास्थळावर भेट दिली व पंचनामा केला. दरम्यान सदर महिलेचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणी चारठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT