Parbhani news 
परभणी

MLA Saeed Khan father death: आमदार सईद खान यांना पितृशोक ! शेरगुल खान यांचे वृद्धापकाळाने निधन

विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी खान कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे

पुढारी वृत्तसेवा

पाथरी : परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांचे वडील तथा पाथरी येथील ज्येष्ठ नागरिक शेरगुल खान यांचे शनिवारी 11 जुलै रोजी मुंबई येथे निधन झाले. शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पाथरीसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी खान कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

शेरगुल खान हे अत्यंत साधी राहणी, शांत स्वभाव, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांनी आपल्या कुटुंबावर उत्तम संस्कार करत समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे खान कुटुंबाने ज्येष्ठ आधारवड गमावला आहे. त्यांच्यावर आज (रविवार) दुपारी 2 वाजता पाथरी येथे मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी एकता नगर येथील राहत्या घरी ठेवण्यात आले आहे.शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित झाले आहेत.

शेरगुल खान यांच्या पश्चात पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान, विधान परिषदेचे आमदार सईद खान, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहराज खान, तसेच तीन मुले, सुना, नातवंडे आणि असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT