Manwat Ukkalgaon Gas Cylinder Leak Pudhari
परभणी

Parbhani Gas Cylinder Leak | गॅस सिलेंडर गळतीमुळे आग; एकाच कुटुंबातील चौघे भाजले

मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील घटनेने भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Manwat Ukkalgaon Gas Cylinder Leak

मानवत : मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथे गॅस सिलेंडर बदलत असताना गॅस गळती होऊन भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघेजण भाजले असून घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उक्कलगाव येथील शेतकरी प्रभाकर खंडेराव उक्कलकर यांच्या घरातील गॅस सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडण्यात येत होते. त्यावेळी सिलेंडरमधून गॅस गळती सुरू झाली. दरम्यान, अंगणात चूल पेटलेली असल्याने गॅसने अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला.

या आगीत अनंता प्रभाकर उक्कलकर (वय ३८), अंगद उद्धवराव उक्कलकर (वय ३३) आणि मित्रविंदा अनंत उक्कलकर (वय ३०) हे १५ ते ३० टक्के भाजले. त्यांच्यावर मानवत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच प्रभाकर खंडेराव उक्कलकर हेही किरकोळ भाजले आहेत.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे फायरमन राम दहे, मुकेश कुमावत, सय्यद कलीम सत्तार आणि संदीप जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT