manwat swabhimani rasta roko for drought farmers demands  Pudhari photo
परभणी

Parbhani Swabhimani agitation|'कोरडा दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्या', 'स्वाभिमानी'चे मानवतला 'रास्ता रोको'

'कोरडा दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्या', 'स्वाभिमानी'चे मानवतला 'रास्ता रोको'

पुढारी वृत्तसेवा

मानवत : तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतातील पिके वाळून गेली असून शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवार ता. 21 रोजी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शहरातील महाराणा प्रताप चौकात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवीत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चौखट, रामप्रसाद गमे, नामदेव काळे, रणजीत चव्हाण, उत्तम गोरे, दत्ता परांडे, किशन शिंदे, पी टी निर्वळ, मुंजाभाऊ लोढे, गोविंद घांडगे, शिवाजी चौखट, लक्ष्मण शिंदे, आत्माराम चौखट, उत्तम जोगदंड, विलास जोगदंड व माऊली शिंदे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

अशा आहेत मागण्या

मानवत तालुक्यात पावसाने मोठा खंड दिला असून शेतातील उभे पिके वाळून गेली आहेत. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची सरसकट मदत तत्काळ जाहीर करावी, हळद या पिकाचा विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, मागील हंगामातील 300 रुपयांचा उसाचा हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा, जायकवाडी धरणातून 2021 ने पाणी परभणी जिल्ह्यासाठी कालव्यातून तात्काळ सोडण्यात यावे, सर्व शासकीय व खासगी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे.

आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर खाल्ली भाजी भाकरी

नांदेड येथे झालेल्या दुष्काळ बैठकीत मंत्र्यांनी काजू बदामावर ताव मारल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको आंदोलना दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भर रस्त्यात भाजी भाकरी खाल्ली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT