Prostitution Case Pudhari
परभणी

Parbhani Crime | मानवत शहरात देहव्यापारावर पोलिसांचा छापा; दोन महिलांविरुद्ध गुन्हा, आठ जण ताब्यात

नगरपालिकेजवळील सिद्धेश्वर गल्ली परिसरात अवैध देह व्यापार होता सुरू

पुढारी वृत्तसेवा

Manwat Flesh Trade Racket Busted

मानवत : शहरातील नगरपालिकेजवळील सिद्धेश्वर गल्ली परिसरात अवैध देहव्यापारावर सुरू होता. याची माहिती मिळताच परभणी येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकत दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत दोन पुरुष ग्राहकांसह आठ जण ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक मानवत येथे दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने नगरपालिकेसमोरील सिद्धेश्वर गल्लीतील घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी सोनाबाई वसंत शिंदे आणि आशाबाई संदेश सोळंके या पीडित महिलांना स्वतःच्या फायद्यासाठी देहव्यापारास प्रवृत्त केल्याचे उघड झाले.

छाप्यात घरात दोन पुरुष ग्राहकही आढळून आले. त्यामध्ये शेषेराव विश्वनाथ शिंदे (रा. गजानन मंदिराजवळ, मानवत) आणि माणिक तुकाराम पिंपळे (रा. उक्कलगाव, ता. मानवत) यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान घटनास्थळी सात महिलाही आढळल्या.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांच्या दोन नोटा व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी सोनाबाई शिंदे व आशाबाई सोळंके यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT