Girl Kidnapped Case  Pudhari
परभणी

Parbhani Kidnapping Case | मानवत मध्ये अनोळखी व्यक्तीकडून तरुणीला फूस लावून पळविल्याचा गुन्हा

अज्ञात व्यक्तीने तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

Manwat Kidnapping Case

मानवत: मानवत शहरातील एका १९ वर्षीय तरुणीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी २३ सप्टेंबर रोजी सकाळी घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला. नातेवाईक, मैत्रिणी तसेच परिचितांकडे चौकशी करूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. तिचा मोबाईल फोनही बंद असल्याचे निदर्शनास आले.

अखेर कुटुंबीयांनी मानवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत अज्ञात व्यक्तीने तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT