Crime News  File Photo
परभणी

Parbhani Crime | मानवत येथे अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तरुणावर गुन्हा

सतत छेडछाड व मानसिक त्रास दिल्याचा आरोप; स्नॅपचॅटवर फोटो प्रसारित केल्याचे तक्रारीत नमूद

पुढारी वृत्तसेवा

Manwat Minor Girl Death Case

मानवत : मानवत शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने जीवन संपवि ल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा सतत पाठलाग करून त्रास देणे आणि मृत्यूस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलीला त्याच भागातील पवन मुंजाजी माने हा वारंवार त्रास देत असल्याचा आरोप आहे. ‘तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोलत जा’, असा तगादा लावून तो मुलीला मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच आरोपीने मुलीचा फोटो तिच्या संमतीशिवाय स्नॅपचॅट या सोशल मीडिया अ‍ॅपवर स्टेटस म्हणून प्रसारित केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी होईल, या भीतीने आणि मानसिक धक्क्यातून मुलीने ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राहत्या घरी जीवन संपविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मृत मुलीचा भाऊ अमोल जयसिंग लेंगुळे यांनी मानवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पवन मुंजाजी माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बिक्कड पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT