Parbhani Fire News 
परभणी

Parbhani Fire News | मानवतला केशव जिनिंगला भीषण आग, अडीच ते तीन हजार क्विंटल कापूस जळाल्याची शक्यता! (पहा व्हिडीओ)

मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील घटना, गुरवारी रात्री 7 वाजता लागली आग

पुढारी वृत्तसेवा

मानवत : मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील रूढी शिवारात असलेल्या केशव जिनिंग व प्रेसिंग युनिटमध्ये गुरुवारी ता 25 रात्री सात च्या सुमारास कापसास मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली. आग एवढी भीषण होती की, आगीत सुमारे दोन ते अडीच हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी की मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील रूढी शिवारात माजलगाव येथील एका व्यापाऱ्याची केशव जिनिंग व प्रेसिंग युनिट आहे. या जिनिंग मध्ये सध्या कापूस खरेदी सुरू आहे. जिनिंगच्या आवारात हजारो क्विंटल कापूस खरेदी केलेला असून सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक आग लागली.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने लगेचच रोद्र रूप धारण केल्याने कापसाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. आगीचे वृत्त समजतात येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास मोठी मदत केली. रूढी व खरबा येथील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर व शहरातील जिनिंग चे व्यापाऱ्यांनी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT