Farmer Labour Agitation  Pudhari
परभणी

Manvat Protest | मानवतला विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियनचा मोर्चा

ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना देखील साडेतीन लाख रुपयाचे अनुदान द्यावे

पुढारी वृत्तसेवा

Farmer Labour Agitation

मानवत : शहरी घरकुल लाभार्थ्याप्रमाणे ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना देखील साडेतीन लाख रुपयाचे अनुदान द्यावे व थकलेले घरकुलाचे हप्ते नियमित वितरित करावे या मुख्य मागणीसह अन्य मागण्या महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लाल बावटा च्या वतीने सोमवारी (दि.15) मोर्चा द्वारे करण्यात आल्या.

शहरातील संत सावतामाळी रोडवरील जनशक्ती कार्यालयापासून काढण्यात आलेला हा मोर्चा भाजी मंडई समोर आल्यानंतर तहसील प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यात आले.

निवेदनात घरकुल योजनेसह महिलांच्या निराधारचे थकित अनुदान तात्काळ द्यावे, दिव्यांगा प्रमाणे निराधार सह सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयांच्या अनुदान द्यावे, शासकीय योजनेची लावण्यात आलेली 21 हजार रुपये उत्पन्न प्रमाणपत्राची अट रद्द करावी, लाडक्या बहिणीचे बंद केलेले अनुदान तात्काळ सुरू करावे, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करावी, दोन महिन्यांपासून थकीत असलेले राशन धान्य तात्काळ वाटप करावे, यासह अन्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

निवड निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष अशोक बुरखुंडे, लिंबाजी धनले, लिंबाजी कचरे, रानबा कांबळे, नारायण टगुळे, महादेव पिंपळे, दत्तराव जाधव, शिवराम जाधव, ज्ञानोबा मुकदम, रामभाऊ आठवे, रुक्‍मीन शिंदे, भीमराव पांचाळ, संतोष मगर, सुरेश कुटारे, रावण आवचार, शीला कौलवार व रंजना वावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT