सुमित्रा भालेराव  Pudhari news
परभणी

परभणी : महागाव येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू, शेतात काम करत असताना घडली घटना

परभणी: महागाव येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू, शेतात काम करत असताना घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस : ताडकळस येथून जवळच असलेल्या महागाव (ता. पुर्णा) येथे सोमवारी दि. २१ सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास वीज अंगावर पडून मृत्यू झाला. सुमित्रा मधुकर भालेराव (वय 55) दि. 21 सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली.

सुमित्रा भालेराव या शेतात काम करत होत्या. अचानक पाऊस सुरू झाल्याने अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे त्या आपल्या शेतातील सोमवारी सायंकाळच्या सुमारास काम करीत असताना परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.

याचदरम्यान, वीज कोसळताच सुमित्रा भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतिश तावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय चाटे, यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. सुमित्रा भालेराव यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT