अंकुश मस्के Pudhari
परभणी

Parbhani Youth Death | मराठा आरक्षणाचा पुन्हा एक बळी? तरुणाने शेतात गळफास घेऊन जीवन संपविले

जिंतूर तालुक्यातील रेपा येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Jintur Youth Ends Life

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील रेपा येथे एका तरुणाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२३) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंकुश माधवराव मस्के (वय 35, रा. रेपा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अंकुश मस्के हे मागील काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात असल्याचे सांगण्यात आले.

मृत अंकुश मस्के यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा व परिवार असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT