Jintur Jalna Highway Accident
चारठाणा : जिंतूर-जालना महामार्गावरील राखखेडा पाटीजवळ शनिवारी सकाळी ट्रेलर आणि इनोव्हा कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारचालक उद्धव मते (वय ४५, रा. जयपूर, छत्रपती संभाजीनगर) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून नांदेडच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार (क्र. एमएच २० ईजी ७५००) आणि नांदेडहून जालन्याकडे जाणारा ट्रेलर (क्र. एमएच २१ सीएम ९३९९) यांची राखखेडा पाटीजवळ धडक झाली. या अपघातात कारचालक उद्धव मते यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर ट्रेलर चारठाणा पोलिस ठाण्याच्या आवारात आणून उभा करण्यात आला असून, अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हटविण्यात आली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी चारठाणा पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.