अप्पर तहसील कार्यालय Pudhari
परभणी

Parbhani News | चारठाणा येथील अप्पर तहसील कार्यालय बोरी येथे हलविल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट

जिंतूर तालुक्यातील चारठाणा हे गाव दळणवळणासाठी अत्यंत सोयीचे

पुढारी वृत्तसेवा

Jintur Charthana Upper Tehsil Office

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा हे गाव मोठे असून हा भाग डोंगरी असल्यामुळे व नागरिकांना दळणवळणासाठी हे गाव अत्यंत सोयीचे आहे. चारठाणा या गावासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अप्पर तहसील कार्यालया ची निवड केली होती. परंतु, चारठाणा गावाचा अप्पर तहसीलचा निर्णय रद्द करून बोरी गावाला चारठाणा येथील अपर तहसील कार्यालय हलविण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

राज्य शासनाने यापूर्वी काढलेल्या परिपत्रक चारठाणा बोरी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय होणार असल्याचे निर्देश दिले होते. परंतु, अचानक चारठाणा गावाचे नाव वगळून बोरी येथे अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे हे गावे डोंगरी भागातील गावे आहेत. डोंगरी भागातील गावाच्या विचार करता सुरुवातीला अप्पर तहसील चारठाणा येथे होणार होते. परंतु, चारठाणा अप्पर तहसीलच्या पत्ता कट करून हे आपण तहसील बोरी गावाला वळविण्यात आले.

त्यामुळे डोंगरी भागातील 35 गावाच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. विशेष म्हणजे अगोदरच हा भाग डोंगरी असून जिंतूर हे तालुक्याचे अंतर लांब पडते तसेच दळणवळण दृष्टिकोनातून रस्ते अभावी व लांब अंतर असल्याने जिंतूर हे ठिकाण गैरसोयीचे आहे. त्या अनुषंगाने चारठाणा हे कमी अंतरावर केंद्रस्थानी आहे.

चारठाणा येथून वझर, धम धम, कवडा, घागरा, हंडी, असोला, धानोरा , वडी, वाघी, नव हत्ती, हनवत खेडा, सावरगाव, ब्राह्मणगाव, कावी, बोरग लवाडी, कान्हा, जांभरून, शिवाची वाडी, वाडी, मोहाडी, कोठा, बेलुरा, दगडचोप, पिंपरी गीते, माणकेश्वर, जोगवाडा, हल वीरा, रायखेडा, भांबरी, राजेगाव इत्यादी 35 गावाला चारठाणा हे गाव सोयीस्कर पडते.

जिंतूर पासून वरील गावाचे अंतर 50 ते 45 किलोमीटर अंतर आहे. चारठाणा हे गाव 20 किलोमीटर पट्ट्यात मोडते. त्यामुळे शासनाने चारठाणा हे गाव अप्पर तहसील कार्यालयाला विशेष म्हणून निवडले होते. परंतु, अचानक चारठाणा गावचे अप्पर तहसील कार्यालय बोरीला का वळविले? हे मात्र प्रशासनाचे एक कोडेच म्हणावे लागेल.

दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात पुनर्विचार करून चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी द्यावी. अन्यथा 35 गावातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT