प्रातिनिधिक छायाचित्र  file photo
परभणी

गंगाखेडमध्ये चोरीचे सत्र थांबेना; दहा दिवसांत चोरांचा धुमाकूळ

दक्षिणेकडील भाग चोरट्यांच्या रडारवर

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड शहरात ४ जानेवारीपासून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. आज (दि. १४) पहाटे परळी रोडवरील महेश ऑटोमोबाईल्सचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला. परभणी येथील श्वानपथकाला पाचारण केले होते.

महेश आटोमोबाईल चे मालक यांनी पोलिसांशी संपर्क केला. परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील श्वानपथक दुपारी २ च्या दरम्यान येऊन तपासणी करून गेले. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित आहे. परळी नाक्यावरील हाकेच्या अंतरावर असलेले परळी महामार्गावरील मोठ्या व्यावसायिकांना चोरट्यांनी लक्ष केले आहे.

या आधी चोरट्यांनी चैतन्य नगरातील आश्रमात दानपेटी फोडून दरवाजाची तोडफोड केली होती. ओम नगरातील ३ घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. कृष्ण नगरातून ५० हजार रुपये नगदी व लॅपटॉप लंपास केला होता. तसेच ५ जानेवारीरोजी रतननगरातील एका घरात घुसून चोरी केली होती. चोरींचे सत्र चालूच आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मकर संक्रांतीचा सणामुळे महिला आपल्याकडील दाग-दागिने परिधान करतात. परंतु, चोरीच्या घटनांत वाढ झाल्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.

शहराच्या दक्षिणेकडील भाग चोरट्यांच्या रडारवर

शहराच्या दक्षिणेकडील भाग चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसून आले आहे. कारण, परळी रोड ते कृष्णनगर शहराच्या दक्षिणेकडील सीमेलगतच्या भागात सर्वाधिक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT