पूर्णा : तालूका परिसरात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आले होते.यातच,आहेरवाडी गावाजवळील थुना नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे चारतास रस्ते ब्लॉक झाले होते.
यामध्य,माटेगाव ते आहेरवाडी मार्ग, कात्नेश्वर-आहेरवाडी मधला रस्ता, तसेच माटेगाव ते वडगाव रस्ता मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. दरम्यान, आहेरवाडी ते माटेगाव ह्या रस्त्यावर एका ठिकाणी थुना नदीवर नवीन पुलाचे बांधकाम चालू असून ते पूर्ण न झाल्यामुळे तेथील पूलाजवळ पर्यायी रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते.
त्याच बरोबर पुराच्या पाण्याने आहेरवाडी गावाला वेढा दिला होता. यात, सजगीर हिरागीर महाराज मंदिर देवस्थान शुध्दा पाण्याखाली गेले होते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते छगनराव मोरे यांनी दिली. सर्वदूर पाऊस पडला की येथील नद्यांना पूर येवून नेहमीच रस्ते जलमय होताहेत. सजगीर देवस्थान जवळ मोठ्या उच्च पातळीवर पुलाचे बांधकाम करावे.असी मागणी आहेरवाडी ग्रामस्थांतून पुढे येत आहे.
आहेरवाडी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम तिरकस; पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात
दरम्यान,माटेगाव ते आहेरवाडी मार्ग रस्त्यावर एका ठिकाणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सा बां विभागा मार्फत एका गुत्तेदाराने हाती घेतले आहे. ते बांधकाम नदीतील पाणी वाहतूक ही नैसर्गिक पद्धतीने होत असताना त्या प्रवाहानूसार पुल बांधकाम करण्या ऐवजी तिरकस पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे नदीतील पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरुन पिक खरडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.