Sonpeth Farmer Death Pudhari
परभणी

Parbhani Farmer Death | सततची नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले

सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील घटनेने हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Sonpeth Farmer Death

सोनपेठ : तालुक्यातील निमगाव येथे सततची नापिकी आणि वाढलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे नैराश्यात आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्देवी घटना गुरूवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास घडली. रमेश सुरवसे (वय ४३, रा. निमगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

निमगाव येथील किसन सुरवसे यांनी २०१९ मध्ये एक हेक्टर जमीन खरेदी केली होती. त्यांच्या दोन मुलांच्या नावावर ५३ आर जमीन आहे. रमेश सुरवसे हे मागील काही वर्षांपासून शेतीतील सातत्यपूर्ण नुकसानीमुळे चिंतेत होते. २०२५ मध्ये पडलेला ओला दुष्काळ आणि चालू वर्षी (२०२६) पडलेला कोरडा दुष्काळ यामुळे त्यांचे शेतीचे गणित पूर्णपणे कोलमडले होते.

हाती काहीच लागल्यामुळे लोकांकडून आणि बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते सतत राहत होते. याच आर्थिक ताणतणावातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

परिवार आणि पोलीस नोंद

मृत रमेश सुरवसे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी मयताचे मेहुणे महादेव पवार यांनी दिलेल्या खबरीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT