आनंद ढोणे
पूर्णा: तालूक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि त्यातील बारा पंचायत गण सदस्य पद निवडणुकीचा फड आता चांगलाच रंगला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीत अनेक वर्षापासून स्वतःता च्या राजकीय पक्षाची बांधणी, कार्यकर्ते जोडणी असी निष्ठावंतपणे धुरा खांद्यावर घेवूनही काही पात्र असणा-या इच्छुकांचे ऐनवेळी तिकीट कापले.
निवडणूक जिंकण्यासाठी निष्ठावंत नाही तर धनदांडगा व्यक्ती लागतोय,असा पैसावाला पॅटर्न आमलात आणला गेला. असे ताजे उदाहरण ताडकळस जिल्हा परिषद गटात घडल्याचे पहावयास मिळत आहे. यात, जेष्ठ पत्रकार तथा शिवसेना पक्षाचे मागील 20 वर्षापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेशराव मगरे यांचे उबाठा शिवसेना पक्षाने तिकीट कापले. याशिवाय, ताडकळस गटातील भाजपाचे निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ भारत नांदुरे यांची देखील त्यांच्या भाजपाने उमेदवारी डावलली. त्यामुळे या दोन्ही निष्ठावंत आणि दांडग जनसंपर्क, सर्वांशी जवळून परिचय असूनही ह्या दोन्ही प्रमुख पक्षांनी त्यांची उमेदवारी डावलून मोठी गफलत करुन जनतेचा नाराजीचा सुर ओढावून घेतला असल्याचे पहावयास मिळत आहे.
आता यापुढे एकीकडे डॉ भारत नांदुरे हे जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवार म्हणून जोमाने कामाले लागले आहेत. तर दुसरीकडे पूर्वाश्रमीचे शिवसेना उबाठाचे सुरेश मगरे यांनी जनतेच्या पाठबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवत जंगजंग पछाडत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. असे असताना रा काँ चे मगरे यांच्यामुळे शिवसेना उबाठा तर डॉ नांदुरे यांच्या अपक्ष उमेदवारीने भाजपाचे स्थानिक नेते जेकी त्यांचे तिकीट कापण्यात यशस्वी ठरलेत अशांची चांगलीच त्रेधारपीट निघून पंचायत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान,ताडकळस जिल्हा परिषद गट हे (एस सी प्रवर्गासाठी) आरक्षित झाले असून यातील दोन पंचायत गण मिळून एकूण २१५८९ मतदार संख्या आहे. सदरील जि प निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा पासून आपापल्या पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच चालू होती. यात,उबाठाकडून सुरेश मगरे यांनी कार्यकर्त्यासह उमेदवारीसाठी जोर लावला होता परंतू त्यांची उमेदवारी डावलून ईतरास तिकीट देत पैसेवाला पॅटर्न राबवला. त्यामुळे मगरे यांच्या मागील विस वर्षाच्या पक्ष निष्ठेवर पाणी फिरले. ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला गेल्यामुळे नाराजीला पारावर उरली नाही.
तगडा जनसंपर्क आणि अहोरात्र सामाजिक कार्याच्या जोरावर जनतेशी जुळलेली नाळ असतानाही घोर अन्याय करण्यात आला. त्याचबरोबर डॉ नांदुरे हे देखील मागील दहा वर्षांपासून कुटुंबासह निष्ठावंतपणे कार्य करत होते.शिवाय, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे आरोग्य शिबीर घेवून हजारो रुग्णांची मोफत तपासणी औषध पुरवठा केला. विद्यार्थ्यांसाठी एक रुपयात इंग्रजी शिका,असे उपक्रम राबवले.तसेच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग व मनमोकळे व्यक्तीमत्व यामुळे लोकप्रिय असताना भाजपाने उमेदवारी डावलली. असे असताना "पक्षाने नाकारले अन् जनतेने स्विकारले"असा जनमानस तयार झाला आहे.