Parbhani DCC bank election pudhari photo
परभणी

Parbhani DCC bank election : जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरपुडकर - बोर्डीकर एकत्र लढणार काय?

आ. राजेश विटेकर यांचा बँकेसाठी नवी मोट बांधण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

परभणी : सुभाष कच्छवे

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत बँकेचे विद्यमान चेअरमन सुरेश वरपुडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर एकत्रीतपणे निवडणुक लढणार काय? या विषयी उत्स्ुाकता असून आ. राजेश विटेकर यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी काही नवीन सहकाऱ्यांची मोट बांधत निवडणूक रिंगणात उतरायचे निश्चित केले आहे.

मार्च-2021 मध्ये झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये जिल्हा बँकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी चुरसीची लढत झाली होती. यात सुरेश वरपुडकरांच्या पॅनलने 11 जागा पटकावत बँकेवर सत्ता मिळवली होती तर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांच्या पॅनलला 9 जागा मिळाल्या होत्या.

तत्कालीन परिस्थितीत जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भाने राजकीय संघर्षही मोठ्या टोकाला गेला होता. माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी साथ देऊनही बोर्डीकरांना बँकेवर सत्ता मिळवता आली नव्हती. तत्कालीन परिस्थितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्हयाचे नेते असलेल्या सुरेश वरपुडकरांनी आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार व जिल्हा बँकेवर कुठलेही संकट येऊ नये म्हणून सुरेश वरपुडकर भाजपवासी झाले आहेत. तद्नंतर अनेक कार्यक्रमांमध्ूान माजी आ. सुरेश वरपुडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर एकत्रित दिसले आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वरपूडकर - बोर्डीकर एकत्रितपणे लढले तर त्यांच्यात खऱ्या अथार्र्ने मनोमीलन झाल्याचे दिसून येणार आहे. मागील निवडणुकीत सुरेश वरपुडकरांसोबत असलेले राजेश विटेकर जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भाने आ.डॉ. राहुल पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. संतोष बांगर, बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष राजेश पाटील-गोरेगावकर यांना सोबत घेत जिल्हा बँकेसाठी एक तगडा पॅनल निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

माजी आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर एकत्रितपणे लढले तर त्यांची ताकद वाढणार असून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचीही त्यांना मदत होणार आहे. एकंदरीत जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मतदार यादी निश्चित झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रंग भरणार आहे.

  • माजी आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर एकत्रितपणे लढले तर त्यांची ताकद वाढणार असून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचीही त्यांना मदत होणार आहे. एकंदरीत जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT