5 कोटीच्या फसवणूक प्रकरणी, मानवतच्या एकास दिल्ली पोलिसांनी उचलले File Photo
परभणी

Parabani Crime News | 5 कोटीच्या फसवणूक प्रकरणी, मानवतच्या एकास दिल्ली पोलिसांनी उचलले

अटक केलेला खासगी बँकेत पिग्‍मी एजंट

पुढारी वृत्तसेवा

मानवत : सुमारे ४ कोटी ९६ लाख रुपयाच्या फसवणूक प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याचा सहआरोपी म्हणून मानवत शहरातील एक जणांस दिल्ली पोलिसांनी मानवत पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी ता 12 राेजी येथील न्यायालयात हजर करून अटक केली . अटक केलेल्या व्यक्तीचे नाव रामनिवास दागडिया असे असून तो एका खाजगी बँकेत पिग्मी एजन्ट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दिल्ली येथे सायबर क्राईम सेल च्या स्पेशल युनिट कडे २७ नोव्हेंबर २०२४ रोजी राजस्थान अँटिबयोटिक्स लिमिटेड या कंपनीकडून ४ कोटी९६ लाख रुपयाची फसवणूक झाला म्हणून अज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या मोबाईल नंबर वरून संदेश पाठवत राजस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड या कंपनीचा एमडी असल्याचे भासवून वेगवेगळ्या क्रमांकावर दोन आरटीजीएस करवून घेतले होते.

त्यामध्ये एका अकाउंट वर १कोटी 86 लाख तर दुसऱ्या अकाउंट वर ३ कोटी असे एकूण ४ कोटी 86 लाख रुपयांचे आरटीजीएस स्वतःच्या नावावर करवून घेतले होते. याप्रकरणी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी संजय मित्तल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या व्हाट्सअप क्रमांकवर स्वतः कंपनीचे एमडी असल्याचे भासवून ४ कोटी 86 लाख रुपयाची फसवणूक केला म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४)व ३१९(२)अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासांती मानवत येथील रामनिवास दागडीया याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने दिल्ली पोलिसांच्या पथकाने मानवत पोलीस स्टेशनच्या मदतीने रामनिवास दागडीया यांना अटक केली.

काय आहे नेमके प्रकरण

राजस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेडचे मुख्य लेखा अधिकारी संजय मित्तल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून एक व्हाट्सअॅप संदेश आला होता ज्यामध्ये त्यांनी स्वतःला राजस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सादर केले होते आणि तक्रारदाराला त्यांचा नवीन व्हाट्सअॅप नंबर सेव्ह करण्याचे निर्देश दिले होते. या नंबरवर अवलंबून राहून आणि कंपनीच्या एमडीवर विश्वास ठेवून, तक्रारदाराने वापरकर्त्याने सांगितल्याप्रमाणे ४,८६,००,०००/- इतकी मोठी रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर केली होती. ही रक्कम पुढे २७ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. अर्जदार/आरोपी यांच्या नावावर असलेले एक खाते शोधण्यात आले. एलडीएपीपी अर्जदार/आरोपींची चौकशी करण्याची आणि संपूर्ण साखळी उघड करण्याची आवश्यकता असल्याचे सादर करतात. मानवत येथील रामनिवास दागडिया याचे शहरातील एका बँक खात्यात २५ लाख रुपये जमा झाले.

फसवणूक झालेली एकूण रक्कम ४.८६ कोटी रुपये आहे. अर्जदार/आरोपी यांच्या भूमिकेचा विचार करता, मुख्य लाभार्थी खात्यातून त्यांच्या बँक खात्यात २५ लाख रुपये गेले होते. ही रक्कम अर्जदार/आरोपी यांनी इतर तीन बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून त्याच दिवशी चेकद्वारे १ लाख रुपये काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT