पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील चुडावा - नांदेड महामार्गावरील वसमतफाटा येथे भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१७) दुपारी १ च्या सुमारास घडली. जखमींना नांदेड येथे रग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील चुडावा -नांदेड महामार्गावर वसमतफाटा येथे चुडावा शिवारात नांदेडकडून पूर्णेच्या दिशेने भरधाव कार (एम एच २६ सी एच २०३३) येत होती. त्याचवेळी एक दुचाकी ( एम एच २६ सी सी ६५२९) वसमतकडे जात होती. यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी खड्यात पडली. यात दुचाकीवरील न-होजी रामजी येवले ( वय अंदाजे ५५, रा.मार्कंड, ता. नांदेड) व नारायण बाबूराव पुंड (वय ३३, रा. पिंपळगाव, पुंड, ता. नांदेड) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर करत आहेत.