मालेटाकळी येथील तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला.  Pudhari Photo
परभणी

परभणी: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

Parbhani accident| चारठाणा येथील पुलावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा: मालेटाकळी (ता. मानवत) येथील 35 वर्षीय तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला. सुदर्शन कालिदास कदम असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुदर्शन कदम दुचाकीवरून जात असताना जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर हे आपल्या कारने संभाजीनगर येथून येत होते. यावेळी त्यांनी आपले सहकारी सोपान धापसे, नजीर पठाण व अनिल केशवे यांच्या मदतीने तरुणाला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. परिहार यांनी प्रथमोपचार केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT